ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

कोणताही व्यवसाय असो, त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्विस विकू शकता. त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि सर्वात आधी लोकांच्या गरजा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो, ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याच अभ्यासातुन कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआपच मिळेल. नवीन उद्योग करायचा म्हटलं कि त्यासाठी भांडवल, मार्केटिंग स्किल, अनुभव ह्या सर्व गोष्टींची आवश्यक्ता असते. पण असे काही व्यवसाय आहेत कि जिथे ह्या गोष्टी नसल्या, तरी तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण पाहू.

Smartelix-Mobile-Repairing-Business

१.  दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते. अश्या रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान / किरकोळ स्टोअर चालू करू शकता. एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आणि उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे. एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली कि मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.

२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे. त्यामुळे पाणी रिफिल स्टेशन / मोबाईल व्हॅन हा एक चांगला व्यवसाय आहे. अश्या मोबाईल प्युरिफिकेशन व्हॅन सिस्टिम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलबद्ध आहे. ज्या गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.

३. मोबाईल आज चैन न राहता गरजेचा झाला आहे. ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो. मोबाईल साठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज, सिम कार्ड, रिचार्ज व्हाउचर्स आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरु करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.Smartelix-Rural-Variety-Store-India

४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती, आइस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. जर तुमच्या गावाच्या आसपास जवळ कुठे आइस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आइस्क्रीम शॉप हा रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकता. अनेक मोठ्या ब्रॅण्ड च्या फ्रँचायसी घेऊ शकता.

वाचा -   चंदन लागवड, परवानगी आणि उत्पन्न

५. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न, त्यात खवय्यांची कुठेच काही कमी नाही. त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही. त्यामुळे एखादं हॉटेल / स्टॉल सुरु करू शकता. अगदी चहा, भेळ, मिसळ, भजी, वडा पाव, तर्री वडा, सामोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरु करू शकता. पुढे जाऊन याचे रूपांतर मोठ्या हॉटेल मधे करून प्रगती करू शकता. तसे पहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.

६. आपण एका लहानशा गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास, एक पुस्तक स्टोअर उघडू शकता. या स्टोअर मधे तुम्ही विविध लेखकांची विविध शैलींची पुस्तके विकू शकता अथवा भाड्याने देऊ शकता.

७. रिटेल फार्मसी स्टोअर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय. आपण जर परवानाधारक फार्मसिस्ट असल्यास किंवा एखाद्याचे लायसन्स भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर सुरु करू शकता. यात विविध निर्मात्यांकडून बनवलेली उत्पादने (औषधे आणि वैद्यकीय पुरवठा) तसेच इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आपण विक्री करू शकता.Smartelix-Photo-Studio

८. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज भासते. उदा. वह्या, पेन, रिफील, ग्रीटिंग्ज, गिफ्ट, खेळणी, मेहेंदी, ब्युटी क्रीम्स इत्यादी. अश्या सगळ्या वस्तू आपण जनरल / व्हरायटी स्टोअर च्या माध्यमातून विक्री करू शकता. ज्या ज्या वस्तू लोकांना दररोज लागतात त्या तुम्ही इथे उपलब्ध करून विकू शकता.

९. जर तुम्हाला संगणक दुरुस्ती चे ज्ञान असेल तर तुम्ही संगणकाची दुरुस्ती (लॅपटॉप आणि डेस्कटॉप) हा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायात आपल्याला फक्त संगणक दुरुस्ती कौशल्ये प्राप्त करणे, आवश्यक दुरूस्तीची साधने खरेदी करणे आणि नंतर एका चांगल्या ठिकाणी दुकान उघडणे आवश्यक आहे. या प्रकारच्या सेवांसाठी खूप मागणी आहे.

१०. सोशल मिडिया च्या वाढत्या वापरामुळे चांगले नव-नविन फोटो साठी खूप मागणी वाढत आहे. तुम्हाला जर फोटोग्राफी करायाला आवडत असेल आणि फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुमच्याकडे असेल, तर फोटोग्राफी व्यवसाय तुम्ही लहानशा गावात यशस्वीरित्या प्रारंभ करू शकतो. एक चांगला स्टुडिओसह छायाचित्रकार म्हणून आपण केवळ आपल्या फोटो स्टुडिओमध्येच लोकांना आकर्षित करणार नाही, तर आपल्याला विवाह समारंभ, वाढदिवस, राजकीय सभा, मैफिली इत्यादीसारख्या कार्यक्रमांच्या ऑर्डर पण घेता येतील.

वाचा -   विक्री वाढण्यासाठी जाहिरात कशी असावी? उद्योजकांसाठी विशेष गाईड.

११. चांगले दिसणे प्रत्येकालाच आवडते. आजच्या तरुण, तरुणींमध्ये मेकअप करण्याची खूप क्रेझ आहे. याच वाढत्या गरजेचा फायदा घेऊन तुम्ही ब्युटी सलोन सुरु करू शकता. हा एक अत्यंत कमी गुंतवणुकीचा व अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला आधी ब्युटी सलोन चा कोर्से पूर्ण करावा लागेल.

Smartelix-Indian-Bakery-Cookies-Biscuits

१२. आज प्रत्येक घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग केला जातोय व नवीन उत्पादनांची मागणी पण चांगली असते. वस्तू आहे म्हणजे ती खराब होणार आणि दुरुस्त करण्यासाठी चांगला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक लागणार. इलेक्ट्रॉनिक वस्तू उदा. टीव्ही, मोबाईल, पंखे, फ्रिज सारख्या वस्तूंचे रिपेअरिंग सेन्टर आपण सुरु करू शकता. पण त्याआधी रिपेअरिंग चं ट्रैनिंग घ्यावे लागेल.

१३. आज लग्नसराई हि वर्षातून किमान सात-आठ महिने चालते. लग्नात मंडप, लाईट, डेकोरेशन सेट, जेनरेटर, भांडी अश्या अनेक गोष्टी लागतात. यापैकी कोणतेही साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.

१४. बेकरी प्रोडक्ट जसे पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट आणखी बरेच काही आपण स्वतः बनवून विकू शकता. स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या बेकरी असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजारात विकु शकता.

व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा, आणि कामाला लागा.

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही व्यवसाय आहेत का, जे ग्रामीण भागात चांगले फायदेशीर ठरू शकतात? आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

This Post Has 35 Comments

 1. suraj

  नमस्कार, मी सुरज पाटील सध्या आरोहण संस्थेमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून उपजीविका केंद्र साठी काम करत आहे, इथे मोखाडा तालुका मध्ये आदिवासी महिला बचत गात आहेत त्यांना मला उपजीविके चा सोर्स उपलब्ध करून द्यायचा आहे, सध्या कमीत कमी गुंतवणूक करून कोणता बिसनेस करता येयील ज्याची विक्री नाशिक किंवा मुंबई म्र्केत ला करता येईल.
  आम्ही येथील आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन वन उत्पान चे पदार्थ पुरवू शकतो उदा करवंदाचे, रान आंब्यांचे लोणचे , मोहाचे कॉल्ड प्रेस ओईल , दुर्मिळ वनस्पतींचा डिंक इत्यादी
  कृपया जर आपण आम्हास मार्केट उपलब्ध करून देऊ शकाल तर येथील आदिवासी महिलांना नवीन रोजगार भेटेल
  अधिक माहितीसाठी
  call ९९२३२४०९१७ whatsapp ९८९०२४४०८९
  सुरज पाटील

 2. विलास

  सर मला स्टॅम्प पेपर वेंडर चार बिझनेस करायला आवडेल पण त्या साठी काय करावे लागेल आणि वेंडर कोड मिळण्यासाठी काय आवश्यक आहे?

  1. Team Smartelix

   आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस ला भेटून अर्जाची माहिती घ्या

 3. satish

  Annasaheb Patil Arthik vikas mahamandal Hi yojana ahe pan Bank loan det nahi sir,manhun carriaer karta yet nahi

  1. Team Smartelix

   Satish,

   Apla marg apan sodhun kadawa lagel. Prayatna karne sodu naka. Kahi tari paryay nakki milel.

 4. Siddheshwar vilas patole

  कुकुट पालन

 5. More D R

  Book stores sathi licence chi aavshkta aaste ka sir aani xerox la pan licence pahije ka

  1. Team Smartelix

   Shop Act license only. Baki payments sathi bank account, online payment sathi Google Pay etc.

 6. Akshay Awad

  खूपच छान तुम्ही सुचवले आहेत व्यवसाय पण आणखीन एक व्यवसाय तुम्ही सांगितला नाही तो म्हणजे म्हैस गाय पालन याच्यातूनसुदा खूप पैसे मिळू शकतात

  1. Team Smartelix

   नक्कीच या व्यवसायांत पण चांगली प्रगती होईल.

  2. More D R

   Namskar sir . Book stores sathi licence chi aavshkta aaste ka sir aani xerox la pan licence pahije ka

  3. Swapnil khot

   Sir me aata gard mhnun job kartoy .
   Pn mla maja swatacha biznes kraycha aahe
   Maji 12 vi zali aahe

   1. Team Smartelix

    आपण ज्या व्यवसायात इंटरेस्ट असेल त्याची संपूर्ण माहिती घ्या आधी. खर्च साधारण किती लागेल याची माहिती झाली कि पुढील काम सोप्पे होईल. काही मदत लागल्यास कमेंट करा

 7. Manoj sutar

  नमस्कार सर मला बेकरी व्यवसाय करायचा आहे तरी आर्थिक मदत कुठल्या प्रकारे मिळाले

  1. Team Smartelix

   आपण आपल्या ग्रामीण बँकेशी संपर्क करू शकता

 8. D B Mandhare

  Civil Engineer sathi konta business changla aahe

  1. Team Smartelix

   सगळ्यात चांगला व्यवसाय तर स्वतः बांधकाम करणे

   या व्यतिरिक्त तुम्ही खालील व्यवसाय पण करु शकता :
   १. कंस्ट्रक्शन मटेरियल सप्लाय
   २. कंस्ट्रक्शन टूल्स भाड्याने देणे
   ३. जमीन प्लॉटिंग व डेव्हलपमेंट
   ४. सरकारी एजन्सी बरोबर लायसोनींग
   ५. PWD कॉन्ट्रॅक्टर

 9. राहुल दुपारगुडे

  माझे घरगुती उपकरणे दुरुस्ती चे व्यवसाय झालेला आहे पण भांडवल नसल्याने मी टाकु शकलो नाही यासाठी काही योजना आहेत का कर्ज उपलब्ध

  1. Team Smartelix

   राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले आहे. या अंतर्गत कर्ज पुरवले जाते.

   24 x 7 नागरी संपर्क केंद्र – 1800-120-8040

   अधिक माहिती साठी : https://udyog.mahaswayam.gov.in/#/home

 10. Hemant ghare

  Ajoon kahi navin modarn padhti suchva Na jya sahaj ani kami paishyat business karta yeil

 11. दजन्यवाद खूप छान वेवसाय सुचवले आहेत पण माझे घर शहर लागत असल्यामुळे आणि भांडवल नसल्यामुळे काय करावं हे समजत नाही सध्या मी दुसऱ्याकडे काम करत आहे पण माझे त्या पगारात कुटुंब चालत नाही मग मी काय करावं

  1. Team Smartelix

   आपल्याला असलेल्या वेळेत आपण दुसऱ्यांच्या वस्तू विकाव्यात. यात आपल्याला अनुभव मिळेल आणि दोन पैसे सुद्धा. भांडवल तय्यार झाले कि मग स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता.

 12. Yatin Raut

  पालेभाजीचा व्यवसाय करु शकतो तोही व्यवस्थित वातानुकूलित दुकान सुरु करु शकतो आपल्या कडे चपला वातानुकूलीत दुकानात मिळतात आणि शरीरास गरजेची भाजी रस्त्यावर किंवा गटारावर. जर ह्या व्यवसायासाठी कर्ज मिळाले असते तर बरे झाले असते.

  यतिन राऊत… पास्थळ, पालघर – 401504

  मो. 9762451485

  1. Team Smartelix

   धन्यवाद यतीनजी. नक्कीच आपण सांगितलेले व्यवसाय चांगले आहेत.

 13. Parashram gopal bhusare

  Business

 14. Vijay nawale

  खुपच छान माहिती आजुन तुम्ही गार्मिण भागात कुक्कुटपालन हा खुप सोपा व्यवसाय आहे

  1. Team Smartelix

   धन्यवाद. आम्ही पुढील आवृत्ती मध्ये समाविष्ट करु.

 15. Dnyaneshwar Sanjay Gadhe

  रा.चिलपिंपरी ता.मुदखेड जि.नांदेड.

 16. Govind Bhalerao

  Anak hi kasya padathine business karava

Leave a Reply