नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी “बिझनेस चा मास्टर प्लॅन”

You are currently viewing नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी “बिझनेस चा मास्टर प्लॅन”

भारतात आता तरुणांचा व्यावसायिक होण्याकडे कल वाढत चालला आहे हेच दिसते, त्याच अनुषंगाने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेले नवउद्योजक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे..!!

मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनों मे जान होती है,
बस यु ही पंख होनेसे कुछ नही होता, हौसलो से उडान होती है..!!

आमच्या अनुभवातुन आणि इतर यशस्वी व्यवसायिकांबरोबर चर्चा करून तय्यार केलेला “बिझनेस चा मास्टर प्लॅन” च्या आधारे नवउद्योजक आपला व्यवसाय सुरु करू शकतील. हा प्लॅन ६ टप्प्यांमधे विभागलेला आहे. पाहुयात काय आहेत हे टप्पे:

Smartelix-self-reflection-business१. स्वतःचा शोध घ्या –
तुम्हाला कशा प्रकारची कौशल्ये अवगत आहेत? कोणत्या गोष्टीबद्दल तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे? तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल? तुम्हाला कशा प्रकारे काम करायला आवडेल ? या मुलभूत प्रश्नांचा शोध घ्या
खरं तर तुम्हाला एखाद्या क्षेत्राचा पुरेसा अनुभव गाठीशी असणे चांगले आहे पण अनुभवा अभावी एखाद्या क्षेत्रात जाण्याची भीती बाळगू नका. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणतो, “वेगाने बदलणाऱ्या या जगात जर एखाद्याने धोका पत्करला नाहीत तर तो नक्कीच अपयशी होईल याची खात्री आहे. कारण धोका न पत्करणे हाच सगळ्यात मोठा धोका आहे.

२. चांगली कल्पना शोधा –
एक चांगला व्यवसाय म्हणजे तो आहे जो लोकांची नस ओळखून त्या दृष्टीने पाऊलं टाकतो, ग्राहकाची गरज ओळखून ती भागवतो.
• तुमच्या उत्पादनाला किंवा सेवेला बाजारात मागणी आहे का?
• ग्राहक तुमचे उत्पादन किंवा सेवा विकत घेऊ इच्छितात का?
• तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत इतरांच्या उत्पादन किंवा सेवांच्या तुलनेत नाविन्य आहे का?
• तुम्ही शक्यता असलेल्या उणीवा आणी मर्यादांचा विचार केला आहे का?
• तुमचे उत्पादन किंवा सेवा कायदेशीर आहेत का?
यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर एखादी नवीन कल्पना घेऊन सर्व उत्तरे हो येईपर्यत हे प्रश्न पुन्हा विचारत रहा. तुमची सर्व उत्तरे जर हो असतील तर तुमचे उत्पादन किंवा सेवा सध्यातरी बाजारात उतरण्यासाठी तयार आहे पण हे प्रश्न वारंवार विचारत रहा जेणेकरून तुमचा व्यवसाय व्यवस्थित सुरु राहील.

३. प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करा –Smartelix Research Competitors
कोणत्याही व्यवसायात उतरण्याआधी त्या व्यवसायात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करा त्यांच्याशी द्वेषभावना न ठेवता मैत्रीपूर्ण स्पर्धा करा.

यासाठी प्रतिस्पर्ध्यांची माहिती कशी मिळवू शकता:
• इंटरनेट – तुम्ही इंटरनेटवरून प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात त्यांची पद्धत काय, त्यांना असलेला ग्राहकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा आहे याबद्दल माहिती मिळवा.
• इतर माध्यमं – इतर माध्यमांद्वारे (उदाहरणार्थ – वर्तमानपत्र, मासिक, पत्रक इत्यादी) येणाऱ्या जाहिराती, माहिती याकडे लक्ष द्या. त्यांच्या जाहिरातींच्या पद्धतीबद्दल जाणून घ्या.
• उपस्थिती – प्रतिस्पर्ध्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावा, तेथील संबंधित व्यक्तींची भेट घ्या, प्रतिस्पर्ध्यांबद्दल जाणून घ्या. प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने, त्यांच्या कमकुवत बाजू यांची नोंद घ्या.
• अभ्यास – प्रतिस्पर्ध्यांची काम करण्याची शैली, पद्धत आणी शक्य असल्यास उत्पादन किंवा सेवा निर्माण करण्याची तसेच ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती घ्या.

४. व्यवसायाचा आराखडा तयार करा –
प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी एक प्रारंभिक स्वरूपाचा आराखडा तयार करा. एक यशस्वी व्यावसायिक आराखडा तुमच्या व्यवसायाची कल्पना योग्य प्रकारे मांडेल. व्यवसाय चालवण्यासाठी तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे आखा. तुमच्या व्यावसायिक आराखड्यात खालील गोष्टी असायला हव्यात..
• व्यवसायाची संकल्पना – व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल मुलभूत माहिती, व्यवसायाची रचना (वन पर्सन कंपनी, खासगी कंपनी, पार्टनरशिप फर्म इत्यादी) आणी तुम्ही जी सेवा किंवा उत्पादन सादर करणार आहात त्याबद्दलची माहिती.
• मार्केट आणी प्रतिस्पर्धी – जे ग्राहक तुमच्या सेवा किंवा उत्पादनात घेण्यात रस दाखवू शकतील त्यांची माहिती. तुमची सेवा किंवा उत्पादन यांच्याशी साधर्म्य असणारी इतर सेवा किंवा उत्पादन यांची माहिती त्याचबरोबर त्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांची माहिती.
• विक्री आणी विपणन (मार्केटिंग) – तुम्ही ग्राहकांपर्यंत तुमची सेवा किंवा उत्पादन कसे पोहोचवणार आहात तसेच ते वापरण्यासाठी कसे आकृष्ट करणार आहात याबद्दलची तुमची योजना.
• व्यवस्थापन विभाग – सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणाऱ्या विभागाविषयी माहिती. उदाहरणार्थ कोणत्या प्रकारची व्यक्ती कोणत्या प्रकारची जबाबदारी सांभाळेल, कोणत्या प्रकारच्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारची कौशल्य अपेक्षित आहेत इत्यादी
• आर्थिक बाजू – तुम्ही सेवा किंवा उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेला खर्च, इतर खर्च आणी अपेक्षित नफा या सर्वांचा ताळेबंद करून जे भांडवल अपेक्षित आहे ते आणी त्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती.
(विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यवसाय सुरु करू इच्छिणार्यां साठी भारत सरकार तसेच खासगी बँकांच्या कर्ज योजना उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून घेता येईल)

५. गुरु, सल्लागार, दिशादर्शक –
आराखडा तयार झाल्यावर त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्ती ज्या तुम्हाला दिशा दाखवू शकतील अशा व्यक्तींशी संपर्क साधा,

• शंका – व्यवसायासाबद्दल त्यांच्याकडून तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या.
• आवश्यक बाबी – व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींबद्दल जाणून घ्या.
• अनुभव – व्यवसायातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या.
• पूर्वतयारी – त्यांच्या मदतीने व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करा.

६. व्यवसायाची नोंदणी –
काही पद्धतीचे व्यवसाय नोंदणी न करता देखील करता येत असले तरी व्यवसायाची नोंदणी केल्याचे बरेच फायदे आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रकाराखाली व्यवसायाची नोंदणी करू शकता

• One Person Company (वन पर्सन कंपनी) – भारतात हा प्रकार नुकताच खुला करण्यात आला आहे, आता तुम्ही (केवळ एक व्यक्ती, तुम्ही किंवा कोणीही) खासगी कंपनी सुरु करू शकता.
• Private Limited Company (प्रायवेट लिमिटेड कंपनी) – तुम्ही आणी तुमचे सहकारी मिळून प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन करू शकता. जिथे तुम्ही निवडलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तुमच्या वतीने काम पाहतील.
• Partnership Firm (पार्टनरशिप फर्म) – तुम्ही आणी तुमचे सहकारी मिळून पार्टनरशिप फर्म देखील स्थापन करू शकता.
(व्यवसायाच्या नोंदणीसाठी एखाद्या सनदी लेखापालाची म्हणजेच Charted Accountant ची मदत घेऊ शकता)..

नोंदणी झाल्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता, उद्योजकतेच्या इतर घटकांबाबत आपल्याला माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा. पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

This Post Has 10 Comments

 1. Chandrakant Patil

  मला आपली माहिती खुप आवडली असेच मार्गदर्शन करत रहा…!
  आणि गरज लागली तर मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.🙏🏻

 2. Krishna

  सर मला पार्टनरशीप फर्म नोंदणी करायचं आहे

  1. Team Smartelix

   वकिलांकडून पार्टनरशिप डीड करुन घ्यावी लागेल

 3. Kshitij Suresh Lakhe

  Your guidance is helpful. Would you like to suggest some Buizness ideas? Most the persons are just confused for decision. So I have to suggest that you should provide some start ideas with capital cost. So It will be easy to choose one direction based on capital and manpower.
  Thank you

  1. Team Smartelix

   Sure. We will be coming up with such information. Stay Connected.

   1. Chandrakant Patil

    मला आपली माहिती खुप आवडली असेच मार्गदर्शन करत रहा…!
    आणि गरज लागली तर मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.🙏🏻

Leave a Reply