पैसे नसतानाही अशाप्रकारे करू शकता व्यवसाय

You are currently viewing पैसे नसतानाही अशाप्रकारे करू शकता व्यवसाय

आजच्या या डिजिटल युगात नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर अनेक जणांचा भर आहे. जितकं नवीन उद्योग करण्याबाबत बोललं जातंय, तितके नवीन उद्योग सुरु होताना दिसत नाहीयेत. या गोष्टीकडे बारकाईने पहिले तर लक्षात येते, नवउद्योजकांजवळ व्यवसायाच्या अनेक नवीन कल्पना आहेत. तसेच ते नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक सुद्धा आहेत. पण त्यांना तो सुरु करता येत नाही कारण पुरेसे भांडवल त्यांच्याकडे नाहीये.

परंतु भांडवल नसेल तर व्यवसाय करताच येत नाही का?

तसं नाहीये. तुम्ही भांडवल नसताना ही अनेक पद्धतीने व्यवसाय सुरु करू शकता.

व्यवसायाची यशस्वीपणे सुरुवात करण्यासाठी तुम्हांला काही चरणांचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे, अशावेळी तुमच्याकडे काही मार्ग आहे. कोण कोणते पर्याय आहेत ते आपण पाहूयात –

१. गुंतवणूकदार शोधा:  तुम्ही जो व्यवसाय निवडलाय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तो उत्तम प्रकारे कसे करू शकता, हे गुंतवणुकदारांला तुम्हाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे. व्यवसायाची कल्पना त्यांना आवडली तर गुंतवणूकदार पैसे गुंतवतील.

यालाच तुम्ही स्टार्टअप फंडिंग म्हणू शकता. कारण गुतंवणूकीदाराला तुमच्यापेक्षा पैसे महत्वाचे आहे. त्यामुळे तो आपला पैसा अशा ठिकाणीच गुंतवणार जिथून त्याला परतावा मिळण्याचे आश्वासन आहे.  फक्त अशाप्रकारे पैसे गोळा करताना एक गोष्ट लक्षात घ्या की भागीदारीच्या सुरुवातीच्या काळात ५१% पेक्षा कमी होणार नाही याची काळजी घ्या.

२. ब्रोकर किंवा एजंट व्हा: गुतंवणुकीदर पैसे गुंतवण्यास तयार नसेल, तुमच्याकडे कोणतीही कल्पना नसेल, स्पेशल प्लॅन नसेल, अश्या वेळी तुम्ही वेगवेगळ्या कंपनीसाठी साठी कमिशन बेसिस वर काम करू शकता. याला फ्रिलान्सर्स किंवा एजन्ट म्हटले जाते. तुम्ही अशा व्यवसायिकांना, कंपन्यांना जॉईन होऊ शकता ज्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कमिशन बेसिस वर एजंट हवे असतात. कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही या लोकांना त्यांचे क्लायंट मिळवून देऊ शकता किंवा त्यांचे प्रोडक्ट विक्री करण्यास मदत करू शकता. याबदल्यात तुम्हाला ठरलेले उत्पन्न मिळेल.

३.फ्रिलान्सर म्हणून काम करा: जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही रिपेअरींग, मार्गदर्शन, भाषांतर व स्पष्टीकरण, चित्रपट आणि व्हिडिओ उत्पादन, संगीत, लेखन, अभिनय, संगणक प्रोग्रामिंग, वेब डिझाइन, ह्या फील्ड मध्ये काहीही खर्च न करता स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. बर्याच व्यावसायिकांकडे कर्मचारी नसतात, त्याऐवजी फ्रिलान्सर्स ठेवणे ते पसंत करतात. एक फ्रीलान्सर आपले स्वत:चे शेड्यूल निवडून, कधी आणि कुठे हि काम करू शकतो.

जर तुम्हाला खरच व्यवसाय करायचा असेल,  किंवा साचेबद्ध नोकरी करायची नसेल तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल.  

फक्त तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न मनापासून करा.  मग पहा व्यवसायासाठी कितीतरी पर्याय समोर उभे राहतील.

Leave a Reply