……आणि या लाटेने नवउद्योजकांना गिळंकृत केले !!

You are currently viewing ……आणि या लाटेने नवउद्योजकांना गिळंकृत केले !!

Smartelix people immediate succcessव्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणारे, नेहमी कोणता व्यवसाय चांगला ह्याच्या शोधात असतात. अनेकवेळा आपण अनुभवले असेल की, अचानक एखादा व्यवसाय प्रकशाझोतात येतो आणि सगळीकडेच त्याची चर्चा सुरु होते. तो व्यवसाय कसा फायद्याचा आहे आणि त्यामुळे आपण कसे करोडपती होऊ शकतो या गोष्टी बरेच लोक सांगतात. या बातम्या दररोज तुमच्या कानांवर लाटांप्रमाणे आदळत असतात आणि विशेष म्हणजे लगेच त्या नवीन व्यवसायाचे मार्गदर्शन करणारे जागोजागी तयार होतात.

व्यवसायांच्या लाटेची अनेक उदाहरणे आहेत. त्यात सारधा ग्रुप चिट फंड , स्पिक अशिया, अँमवे, शहामृग (इमू) पालन, जास्त रिटर्न देणारे शेअर मार्केटींग, ससे पालन, क्यूनेट, पैसे डबल करणाऱ्या योजना अशी प्रत्येकाच्या लक्षात राहणारी काही उदाहरणे आहेत. या व्यवसायांची एका काळी लाट आली होती, सगळीकडे ह्याचीच चर्चा असे. दररोज कोणत्यातरी पेपरात बातमी, प्रशिक्षण केंद्रांच्या नविन बॅचेस चा सुळसुळाट, दर दोन चार दिवसांनी या व्यवसायांमुळे करोडपती झालेल्या एखाद्या ऊद्योजकाची माहिती आपल्याला दिसायचीच. ज्याला कोणाला व्यवसाय करायचा असेल आधी तो याच व्यवसायाच्या मागे लागत असे, जणू काय हे व्यवसाय सोडून दुसरे व्यवसाय नव्हतेच.Smartelix MLM Structure

पण ज्या लोकांनी या अश्या रातोरात श्रीमंत होणाऱ्या व्यवसायांमधे गुंतवणूक केली, त्यांची आज काय परिस्थिती आहे? या लाटांमधे वहावत जाऊन ज्यांनी व्यवसाय सुरु केले त्यांची काय अवस्था आहे हे पाहिलंय का? या लाटांवर भरवसा ठेऊन पैसे गुंतवलेले अनेक नवऊद्योजक एकतर तोट्यात गेलेत किंवा त्यांची फसवणूक झाली. अश्या अनेक उद्योजकांचे व्यवसाय ठप्प झालेत अथवा विकले गेले.

मग यात फायदा नक्की कोणाचा झाला? या लाटांमध्ये पैसे कमावले ते शहामृग आणि सस्यांची पिले विकणाऱ्यांनी, व्यवसाय कसा करायचा याचेSmartelix-example-of-ponzi-scheme प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांनी, शेअर मार्केट ब्रोकर लोकांनी आणि इतर दलालांनी. मुळात या लोकांच टार्गेट फक्त स्वतःचा माल विकणे एवढच होतं. ज्यांनी आयुष्यभराची कमाई यात लावली अशी किती तरी कुटुंब उद्धवस्त झाली. हे नवऊद्योजक आता एकतर निराश आणि कर्जबाजारी झालेत किंवा कुठेतरी नोकरी करत आहेत.

अशी जर फसवणूक होत असेल तर व्यवसाय करूच नये का? व्यवसाय नक्की करावा, पण तो सुरु करण्याआधी काही गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आता नक्की कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे हे सविस्तर वाचा आमच्या “बिझनेस चा मास्टर प्लॅन” ह्या ब्लॉग मधे.

Smartelix Taking your moneyआजही अश्या अनेक नवीन व्यवसायांच्या लाटा येत असतात. त्यांच्या जाहिराती पहिल्यापेक्षा बदलल्या असल्या तरी धोरणामधे काडीचाही बदल झालेला नाही. या सगळ्यामधे तुम्हीही नकळत त्या नवीन व्यवसायाकडे आकर्षीत होता आणि कोणताही सारासार विचार न करता पैसे गुंतवता. काही दिवसात असे लक्षात येते की आपली गुंतवणूक चुकीची आहे आणि आपण अडकलो आहोत. या अश्या नवीन व्यवसायाच्या लाटा तुम्हाला आपल्याकडे ओढल्यानंतर पुन्हा किनाऱ्यावर येऊच देत नाही आणि अथक प्रयत्न करून जरी तुम्ही किनारा गाठला; तरी परत भक्कमपणे उभे राहण्याची तुमची ताकद संपलेली असते.

म्हणून ह्या अश्या क्षणिक लाटांमधे अडकु नका, सारासार विचार करा, तुमच्यासाठी काय योग्य आहे याचा शोध घ्या आणि मगच व्यवसाय निवडा. लाटा दिसायला चांगल्या असल्या, त्यांचा आवाज आकर्षक वाटला तरी त्यात पोहत नसतात. पोहण्यासाठी शांत समुद्र आवश्यक असतो.

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

This Post Has One Comment

  1. Raj

    That’s true sirt

Leave a Reply