विक्री वाढण्यासाठी जाहिरात कशी असावी? उद्योजकांसाठी विशेष गाईड.

You are currently viewing विक्री वाढण्यासाठी जाहिरात कशी असावी? उद्योजकांसाठी विशेष गाईड.

Smartelix ad messageआपल्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, व्यवसायची जाहिरात करणे महत्त्वपूर्ण आहे. मग व्यवसाय लहान असो किंवा मोठा. सध्या जाहिरातींसाठी वर्तमानपत्रं, इंटरनेट, सोशल मिडिया, होर्डिंग, पॅम्फ्लेट असे अनेक माध्यम उपलब्ध आहेत. प्रत्येक माध्यमावर जाहिरातीचा खर्च वेगळा आणि त्या माध्यमाची लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद पण वेगळी. जाहिरात हि खर्चिक बाब असून, त्याचा जास्तीत Smartelix Media Signpost Showing Internet Television Newspapers Magazinesजास्त उपयोग विक्री वाढण्यामधे होणे गरजेचे आहे. अगदी फ्री असणाऱ्या फेसबुक किंवा व्हाट्सअॅप वर पण जाहिरात / आपली माहीती पोस्ट करताना सुद्धा अनेक प्राथमिक बाबी विचारात घेतल्या पाहिजे. आम्ही आपल्यासाठी अश्या काही प्राथमिक गोष्टींची यादी केली आहे.

१. जाहिरात सुटसुटीत असावी, ती कशा संदर्भात आहे लगेच लक्षात यायला हवे.

२. जाहिरातीत कमीत कमी शब्दांचा वापर करावा. मुख्य शब्द उठावदार असावेत आणि त्यांचा ठसा लोकांवर पडला पाहिजे.

३. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त व नेमकी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.

४. कोणतीही जाहीरात सरासरी ४-७ सेकंद लक्षपूर्वक पाहिली जाते. म्हणून सगळ्यात महत्वाची माहिती जाहीरात सुरु होतानाच सांगावी.

५. डिझाईन चे ज्ञान असेल तरंच स्वतः जाहीरात  तयार करावी. अन्यथा व्यावसायिक डिसायनर कडून नेहमी ती तयार करून घेणे.

६. एक डिझाईन थिम ठरवल्यानंतर तिच्याभोवतीच डिझाईन फिरती ठेवा.

Smartelix ad dos donts७. तुम्ही सर्वोत्तम आहात हेच जाहीरातीतुन दिसले पाहीजे.

८. तुमचा ब्रँड अप्रत्यक्षपणे लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करावा. निदान तुमच्या ब्रँड ची छाप त्यांच्यावर झालीच पाहिजे.

९. जाहिरातीमध्ये रंगसंगती खूप महत्त्वाची आहे. लाल, हिरवा, पोपटी, पांढरा आणि जांभला रंग जास्त प्रमाणात वापरला पाहिजे. कारण हे रंग थेट तुमच्या मेंदूवर छाप पाडतात.

१०.जाहिरातीचा अतिरेक करु नका, अती जाहिराती ग्राहकांना तुमच्याविषयी नकारात्मक बनवतात. जाहिरात ही लोकांना आकर्षीत करण्यासाठी असते, त्रास देण्यासाठी नाही.

११. जाहिरातीमधे आकर्षक चेहरा घेतल्यास उत्तम.

१२. जाहिरातीत तुमचे प्रोडक्ट घेण्यासाठी विनंती करायची नसते. लोकांना तुमच्या उत्पादनाची गरज जाणवली पाहिजे याप्रकारे जाहिरात Smartelix ad tipsकरावी.

१३. तुमच्याकडे काय भेटतं फक्त एवढेच सांगणे म्हणजे जाहिरात होत नाही. तुमच्याकडे ईतरांपेक्षा वेगळं काय भेटतं हे पण नक्की सांगा.

आपली जाहिरात करायची पद्धत बदला. मग तुमची विक्री पण नक्कीच वाढेल. जाहिरातींबद्दल अधिक माहितीसाठी किंवा आम्हाला आपला बिसनेस कन्स्लटंट नेमण्यासाठी आजच संपर्क करा किंवा आम्हाला ई-मेल करा

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

This Post Has 2 Comments

  1. Jaysing patil

    Very nice sir .

    1. Team Smartelix

      Thanks. Let us know of any more topics you would like us to cover.

Leave a Reply