डिजिटल मीडिया : काय आहेत नोकरी च्या नवीन संधी.

You are currently viewing डिजिटल मीडिया : काय आहेत नोकरी च्या नवीन संधी.

सध्याचं युग हे डिजिटल आहे. जो दिसेल तो फेसबुक, स्नॅपचॅट, ट्विटर नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपवर तरी असतोच. वेगाने वाढणाऱ्या या डिजिटल विश्वात करिअरच्याही अफाट संधी आहेत. भारतात ४० कोटी डिजिटल लोकसंख्या आहे. ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. म्हणजेच त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक आपल्याकडे इंटरनेटचा वापर करतात. म्हणूनच पुढील काही वर्षांत डिजिटला मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होणार आहे.

डिजिटल मीडिया वापरकर्त्यांचा ऑनलाइन मार्केटिंगचा कल, ओढा आणि आवड लक्षात घेऊन विविध कंपन्या आपल्या व्यूहनीती आखत आहेत. जीवनातील प्रत्येक घटकाशी निगडित मोबाइल अ‍ॅप्स नित्य तयार केले जात असल्याने डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्राला अधिक गती प्राप्त झाली आहे. संगणकाचा शोध, त्यापाठोपाठ आलेले इंटरनेट, नंतरचे वेब, पुढे ई मेल्स आणि आता सोशल मीडिया असा हा आयटी जगताचा आश्चर्यजनक वेगवान प्रवास आहे. आज समाजमाध्यमातून जग इतके जवळ आले आहे की, घरातले कोणी परदेशात असेल, तर त्यांच्याशी संपर्क ठेवणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती ठेवणे, अगदी सोपे झाले आहे. अल्पावधीत सोशल साइट्सचा वापर इतक्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्यावर संवादाच्या या आधुनिक माध्यमांकडे कॉर्पोरेट सेक्टरची नजर न जाती तर नवल. भारतासारख्या विकसनशील देशातसुद्धा कोटय़वधी लोक रोज शंभराहून अधिक वेळ तरी फेसबुक, ट्विटर, लिंकडीन अशा अनेक समाजमाध्यमांना भेट देतो. जगातील प्रत्येक देशात दरदिवशी समाजमाध्यमांवरील लोकसंख्येत भर पडत आहे. यामुळेच औद्योगिक, शैक्षणिक, टुरिझम अशा विविध क्षेत्रांतील संस्थांनी उत्पादनांच्या जाहिरातींसाठी एक नवे आणि स्वस्त माध्यम म्हणून समाजमाध्यमांचा वापर सुरू केला आहे. समाजमाध्यम जाहिरातींसाठी एक प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत. डिजिटल मार्केटिंगमधील करिअरच्या संधी अधिकाधिक विस्तारत आहेत. तज्ज्ञांच्या मते दरवर्षी हे क्षेत्र ४० टक्क्यांनी आर्थिक प्रगती करत आहे. त्यामुळे इंटरनेटविषयीचे अर्थकारण वाढण्याची शक्यता दिवसागणिक वाढत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील कंपन्या किंवा उत्पादक डिजिटल मीडियावर १० हजार कोटी रुपयांचा खर्च करतात.

ऑनलाइन खरेदी-विक्रीकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने डिजिटल मार्केटिंग क्षेत्राचा विस्तार वाढत आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर व्यक्तीला डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पाऊल ठेवता येणे शक्य आहे. या उमेदवारांना सांख्यिकी, अर्थशास्त्र, ई-कॉमर्स आणि कलात्मक दृष्टिकोन याची जाणीव व माहिती असावी. मात्र तंत्रज्ञान आणि मार्केटिंग या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवीधरांना या क्षेत्रात करिअरच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ  शकतात. ही बाब लक्षात घेऊन काही खासगी संस्थांनी डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंगसारखे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या क्षेत्रात दाखल होणाऱ्या उमेदवाराला संगणकीय ज्ञान आणि इंटरनेट वापर उत्तमरीत्या जमणे आवश्यक ठरते.  हल्ली प्रत्येक संस्थेचे संकेतस्थळ असते. ते बनवण्यासाठी तंत्रज्ञांची आवश्यकता असते. अभियंते लागतात. संकेतस्थळाची योग्य मांडणी गरजेची असते. यामध्ये प्रोग्रॅमरचीही गरज भासते. डिजिटल मीडियामध्ये लेखकांना किंवा जास्त नेमकं बोलायचं झाल्यास डिजिटल लेखकांना जरूर मागणी असते. कारण या माध्यमात शब्दांची मर्यादा असते. शिवाय सगळा कंटेंट काहीच शब्दांत, अचूक वेळी मांडायचा असतो. तो नेमक्या ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असतो.

डिजिटल मीडियातील बऱ्यापैकी माहितीचा असलेला प्रकार म्हणजे सोशल मीडिया मॅनेजर. प्रसिद्ध व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरील खात्यांवरून मजकूर पोस्ट करणे, ते खाते सांभाळणे हे काम सोशल मीडिया मॅनेजरचे असते. या कामात सतत माहिती अद्ययावत करावी लागते. सतत ऑनलाइन राहावे लागते. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. त्यांना सांभाळावे लागते. त्या व्यक्तीची समाजातील प्रतिमा राखण्याचे काम कळत नकळत ही समाजमाध्यमे करत असतात.

या माध्यमात माहिती शास्त्राला खूप महत्त्व असते. या आकडय़ांच्या विश्लेषणावरून डिजिटल मीडियातील पुढची खेळी ठरत असते. त्यामुळे माहिती विश्लेषकाला खूप महत्त्व असते. डिजिटल मीडिया कंपनी काम करताना पहिल्यांदा आपला प्रेक्षकवर्ग ठरवते. मग त्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी नेमक्या कोणत्या समाजमाध्यमांचा उपयोग करावा लागले, हे ठरवले जाते. त्यानुसार त्याची रणनीती आखली जाते.

डिजिटल मीडियामध्ये अत्यंत कमी भांडवलामध्ये तुम्ही स्वत:चा ब्लॉग, स्वत:चे यू टय़ूब चॅनल. फेसबुक, इन्स्टाचे अकाऊंट चालवू शकता. तुमच्याकडे उत्तम फॅन फोलोइंग असेल तर अनेक मोठे ब्रँड्स तुमच्याकडे स्वत:हून येऊ  शकतात. या ब्रँडला तुमच्या माध्यमातून थेटच एक मोठा प्रेक्षकवर्ग मिळत असल्याने तुम्हालाही उत्तम पैसे कमावण्याची संधी असते.

एखाद्या विशिस्ट करिअरची माहिती हवी असल्यास खाली कमेंन्ट करावी. आमच्याशी संपर्क करण्याकरिता: +919326237923 किंवा [email protected]

वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

Leave a Reply