मुलांच्या हातात मोबाईल देताय? मग हे जरूर वाचा

You are currently viewing मुलांच्या हातात मोबाईल देताय? मग हे जरूर वाचा

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला मोबाईल फोन आता लहानग्यांच्या हातातही सर्रास दिसतो. अनेकदा मोबाईलमधील आपल्याला माहित नसतात इतक्या गोष्टी त्यांना इतक्या त्यांना माहिती असतात. आई-वडिलही मुले त्रास द्यायला लागली, जेवत नसतील, सतत रडत असतील तर त्यांच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात. यामुळे मूल तात्पुरते शांत होते. मात्र सतत मोबाईल हातात देणे नक्कीच चांगले नाही. मुलांच्या हातात एकदा स्मार्टफोनच्या दिला की त्यांना व्यसनांच्या आहारी ढकलल्यासारखेच म्हणता येईल.
स्मार्टफोनमुळे कोणते धोके उद्भवतात?

– सतत स्मार्टफोन हातात असल्याने मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. ते एकाच ठिकाणी बसून मोबाईलमध्ये डोके घालून गेम खेळत बसतात.

– मोबाईल गेम समोर असेल तर अशा मुलांना इतर जगाचे भान राहत नाही. ते नादीष्ट होतात.

– ही सवय इतकी वाईट असते की एखादवेळी त्यांना मोबाईल देण्यास नकार दिल्यास ते सैरभैर होतात आणि खूप चिडचिड करतात.

– सतत मोबाईलवर राहिल्याने मुलांची कल्पनाशक्ती खुंटते.

– मोबाईलवर सतत राहण्याची सवय लागल्याने या मुलांची संवाद कौशल्ये विकसित होत नाहीत. त्यामुळे संवाद साधणे हे त्यांना आव्हाने वाटू लागते.

– सतत डोळ्यापुढे मोबाईल असल्याने त्यांचा मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. सुरुवातीला हे पालकांच्या लक्षात येत नाही मात्र कालांतराने मुलांमधील हा बदल पालकांना जाणवतो.

Leave a Reply