आपल्यासाठी योग्य करियर जाणून घ्या
आजच आपल्या क्षमतेचं संपूर्ण मूल्यांकन करुन आपल्यासाठी योग्य करियर माहिती करा
या ट्रैनिंग मधून काय मिळेल?
स्मार्टएलिक्स® करियरवेध™ आपल्याला पाच वेगवेगळ्या टप्प्यांवरुन घेवुन जाईल, ज्याने आपली करियर निवड सोप्पी आणि सोयीस्कर होईल. प्रत्येक टप्पा हा तपशीलवार संशोधन करुन मग डिझाईन केलेला आहे, ज्याने तुमचे करियर निवडी संबंधित शंका आणि गोंधळाचे निरसन होईल.
विद्यार्थी मुल्यांकन
हा करियर मार्गदर्शन कार्यक्रम आपल्याला पाच वेगवेगळ्या टप्प्यांवरुन घेवुन जाईल, ज्याने आपली करियर निवड सोप्पी आणि सोयीस्कर होईल. प्रत्येक टप्पा हा तपशीलवार संशोधन करुन मग डिझाईन केलेला आहे, ज्याने तुमचे करियर निवडी संबंधित शंका आणि गोंधळाचे निरसन होईल.
करियर जागरुकता
ह्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक करियर संबंधित माहिती दिली जाते व त्यांची योग्यता वेगवेगळ्या उपक्रमांमधून तपासली जाते. या सोबतच त्यांना सर्व करियरर्स ची संपूर्ण माहिती देऊन त्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले जाते.
विद्यार्थी मुल्यांकन व करियर मॅपिंग
वरील दोन्ही टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे केलेले मुल्यांकन आणि त्यांची करियर जागरुकता याच्या आधारे त्यांच्यासाठी योग्य असणारे करियर शोधले जाते. हे योग्य करियर आणि व्यक्तिमत्व विकास याची तपशीलवार आखणी केली जाते.
तज्ञ समुपदेशक मार्गदर्शन
स्मार्टएलिक्स® सोबत काम करणारे तज्ञ समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांची शाखा, करियर, अभ्यासक्रम, आणि इतर शंका वैयक्तिक मार्गदर्शन करुन आखून देतात.
करियर रोडमॅप प्लॅनिंग
आमचे करियर मेन्टॉर वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांसोबत बसुन त्यांच्या योग्य करियर पर्यंत पोहचायचा संपूर्ण आराखडा तय्यार करुन घेतात. या आराखड्यात शाखा, अभ्यासक्रम, कॉलेज निवडीबाबत मार्गदर्शन करतात. संपुर्ण आराखडा समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांना करियर संबंधित स्पष्टता मिळायला मदत होते.
प्रशिक्षणानंतरचा आधार
आमचा स्मार्टएलिक्स® करियरवेध™ प्रशिक्षण कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आमचे करियर मेन्टॉर त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व करियर संबंधित अडचणी, शंका ते कधीही आमच्या तज्ञ मार्गदर्शकांना विचारु शकतात.
आमचे प्रशिक्षण कार्यक्रम
आमचे तज्ञ करियर मेन्टॉर आणि समुपदेशक आपल्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर आहेत
- For Students
- For Institutions
वर्ग ८-९
शाखा आणि विषय निवड
या कार्यक्रमात आम्ही विद्यार्थ्यांचे संपूर्ण मूल्यांकन करतो, ज्याआधारे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक त्यांना योग्य अशी शाखा आणि अभ्यासक्रमातील विषय निवडायला मदत करतात.
वर्ग १०-१२
करियर निवड आणि नियोजन
आम्ही विद्यार्थ्यांची कल चाचणी करुन त्यांच्या स्किल, योग्यता, आवड, व्यक्तिमत्व याचे संपूर्ण मूल्यांकन करतो. या मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी चांगले करियर व त्याबाबतचे योग्य अभ्यासक्रम, कॉलेज निवड करण्यात आमचे मार्गदर्शक त्यांना समुपदेशन करतात. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचे सुद्धा समुपदेशन करुन आमचे मार्गदर्शक प्रत्येकाला करियर बाबतीत स्पष्ट आराखडा डिझाईन करायला मदत करतात.
पदवीधर
करियर निवड आणि विकास
आपल्या आयुष्यातील ध्येयावर आधारित आपला पुढचं पाऊल कोणत्या दिशेला घेतले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती घ्या. तसेच आपल्या स्किल आणि व्यक्तिमत्वाचे संपूर्ण मूल्यांकन करुन वैयक्तिक समुपदेशन द्वारे आपले करियर सुरु करा.
संस्थात्मक करियर मार्गदर्शन कार्यक्रम
आमच्या नाविन्यपूर्ण करियर मार्गदर्शन कार्यक्रमात आम्ही, विद्यार्थ्यांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून संपूर्ण मूल्यांकन करुन त्यानुसार करियर बाबतीत स्पष्ट आराखडा देतो. करियर बाबतीत काम करताना शाळांसोबत, विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबर एक एन्ड टू एन्ड इकोसिस्टिम स्थापन करण्याचा आमचा मानस आहे.
करियर मार्गदर्शन परिसंवाद
आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांसोबत विविध करियर च्या पर्यायांबद्दल परिसंवादाच्या माध्यमातून चर्चा करतात. यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा, त्यांना सामोरे जायची पद्धत, घ्यावे लागणारे अभ्यासक्रम, त्यांची पात्रता अश्या अनेक पैलूंबाबत चर्चा होतात.
तज्ञ संवाद
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करियर बाबत जागरुकता व्हावी आणि त्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांना विद्याथ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावतो. यामुळे विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील संधी, प्रगती, आव्हाने आणि इतर अश्या बारकाव्यांची माहिती मिळते.
एंट्रन्स / स्पर्धा परीक्षा तयारी
या कार्यक्रमात आम्ही विद्याथ्यांना विविध एंट्रन्स परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यासंबंधित माहिती देतो. यात परीक्षेचा पॅटर्न, अर्जाची पद्धत, मार्क वाढवायची स्ट्रॅटेजि, अभ्यासक्रमाची सुटसुटीत तयारी आणि इतर अश्या अनेक पैलूंबाबत मार्गदर्शन करतो.
आमच्या यशाच्या गाथा
करियर स्पष्टतेकडे आजच पहिले पाऊल उचला
भारतातील सर्वात प्रगत विद्यार्थी कल चाचणीमध्ये सहभागी व्हा