सेल्स प्रोफाइल अश्याप्रकारे देऊ शकते तुमच्या आयुष्याला कलाटणी

You are currently viewing सेल्स प्रोफाइल अश्याप्रकारे देऊ शकते तुमच्या आयुष्याला कलाटणी

Smartelix-Dynamic-Duo-Closing-More-Deals-with-Sales-and-Marketing-Alignment

मागच्या महिन्यात सेल्स ट्रैनिंग देणाऱ्या माझ्या एका मित्राशी चर्चा सुरु होती. त्याने मला माझ्या सततच्या सेल्सच्या दौऱ्याबद्दल विचारले. मी म्हणालो की, फिरणे व लोकांना भेटणे हा तर माझ्या कामाचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी पुढे खोलवर चौकशी करत विचारलं की, “सेल्स मध्ये नक्की तुला काय आवडतं?” मी त्याला म्हणालो, “नवीन लोकांना भेटणे, त्यांच्या व्यावसायिक अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी योग्य पर्याय सुचविणे मला आवडते.”smartelix-live-chat-ecommerce-sales

आमच्या गप्पांचा ओघ असाच सेल्स च्या दिशेने पुढे चालू राहिला. मी त्याला म्हणालो, “माझं ठाम मत आहे की प्रत्येकाने किमान एक वर्ष तरी सेल्स मध्ये नोकरी करावी”. माझ्या या मताने त्याची उत्कांठा  वाढली. तो म्हणाला, “तू असं का म्हणतोस? सेल्स सोडून दुसरी कोणती पण नोकरी करायला लोक तत्पर असतात.” मी त्याला सांगितले, सेल्स हे असे प्रोफेशन आहे कि जिथे तुम्हाला अनेक नाकारांना समोरे जावं लागते. क्वचित असा एखादा क्लायंट असेल की जो पहिल्या मिटिंग मधे तुमची वस्तू / सेवा घ्यायला तय्यार होईल. या अश्या नकार सत्रामुळे तुम्हाला आयुष्य आणि लोकांबद्दल नवनवीन पैलू पहायला मिळतात. तसेच आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टीं अश्या लोकांच्या नकारातून शिकत असतो. सेल्स प्रोफेशन आपल्याला अजून एक गोष्ट शिकवते. ती म्हणजे कोणत्याही  गोष्टीकडे / समस्येकडे दुसऱ्या माणसाच्या नजरेतून पाहणे. दुसऱ्यांच्या नजरेतून पाहिल्यावर आपल्याला त्या गोष्टीचे / समस्येचे गांभीर्य अथवा महत्त्व समजणे सोपे होते. त्यामुळे आपण त्या व्यक्तिस चांगला सल्ला किंवा सोल्युशन देऊ शकतो.

smartelix-sales-statsसेल्स प्रोफेशन मध्ये कमालीची स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे आपल्याला नेहमी तत्पर आणि फोकस्ड रहावं लागतं. आपण जी वस्तू / सेवा विकतोय त्याबद्दल पूर्ण माहिती असणे, कॉम्पेटिशन मधे असणाऱ्या कंपनी काय करत आहेत याची माहिती ठेवणे, स्वतःची माहिती वारंवार उपडेट करणे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हल्प करणे, अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. तसेच नवनवीन लोकांना भेटल्यामुळे एक मोठं नेटवर्क तय्यार होते. या लोकांकडुन आपल्याला खूप काही शिकायला मिळते. अश्या पद्धतीने आपण सतत नवीन गोष्टी शिकण्याची कला आत्मसात करत असतो.smartelix-i-can

या सर्व सवयींमुळे आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ आणि कणखर होते. तसेच कोणतीही गोष्ट करून घेण्याची जिद्द आपल्या मध्ये तयार होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सेल्स मधे काम केल्यामुळे आपण शिकत असू, ती म्हणजे आपल्या महत्वकांक्षाना कसे मॅनेज कारायचे. एकदा का तुम्ही महत्वाकांक्षा मॅनेज कारायला शिकलात की आनंद, सुख, समृद्धी, आणि शांती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआपच भेटतात.

त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येकाने सेल्स मध्ये कमीत कमी एक वर्ष तरी घालवले पाहिजे.

तुमचं काय मत आहे? खाली कॉमेंट मधे कळवा

Leave a Reply