स्वप्नाळू पालक, इंजिनियरिंग चं भूत आणि वाढती बेरोजगारी

You are currently viewing स्वप्नाळू पालक, इंजिनियरिंग चं भूत आणि वाढती बेरोजगारी

Smartelix-economic-growth-India-GDP

आज आपण पाहतोय की इंजिनिअर लोकांना नोकरी मिळवण्यात फार अडचणी येत आहेत. पण हे असं का होतंय, हे शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही.

१०-१२वी झाली की फक्त इंजीनियरिंग हेच एकमात्र करिअर असल्याचा सर्व पालकांचा ग्रह झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे, नवीन विद्यार्थ्यांचा आज इंजिनिअर होण्याकडे जास्त कल आहे. मग पाहुयात की इंजिनिअर लोकांना नोकऱ्या न मिळण्यामागे नक्की काय कारण आहे.

जर आपण अमेरिका आणि इंडियाची तुलना केली तर लक्षात येईल की साधारणतः अमेरिका ची इकॉनॉमी १६ ट्रिलियन डॉलर आहे. ह्या १६ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी साठी अमेरिका दर वर्षी एक लाख इंजिनिअर तयार करते. या विरुद्ध भारताची इकॉनॉमी साधारणतः २.५ ट्रिलियन डॉलर आहे आणि आपण दर वर्षी अंदाजे १५ लाख इंजिनिअर तय्यार करतोय.

आता हि इकॉनॉमी म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपल्या देशा मधे उद्योग किंवा सेवा व्यवसायातून जे काही पैसे तयार होतात त्याला आपण देशाची इकॉनॉमी असे म्हणतो. तर एखाद्या देशाची इकॉनॉमी ही अनेक प्रकारच्या व्यवसायांनी घडलेली असते, त्यात एक व्यवसाय म्हणजे इंजिनियरिंग व त्या संबंधीत इतर व्यवसाय. आता इंजिनिअर लोक फक्त “इंजिनियरिंग व त्या संबंधीत इतर व्यवसायांमध्येच” काम करतात, हे समजून घेतले पाहिजे.

काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे औदयोगिक क्रांती झाली, त्यावेळी इंजिनियरिंग सेक्टर मधील मॅन्युफॅक्चुरिंग विभागात खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या. नोकऱ्यांच्या रिक्त पदांच्या प्रमाणात इंजिनिअर लोकांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे मेकॅनिकल, Smaretlix-engineering-education-employmentइलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिविल ह्या सगळ्या ब्रांच मधून पास होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना (मग ते ITI, डिप्लोमा किंवा डिग्री असोत) नोकऱ्या मिळायच्या. नोकरी ची हमी, चांगला पगार, इतर सुविधा यांच्यामुळे इंजीनियरिंग या क्षेत्राचा त्या काळात दबदबा निर्माण झाला. यामुळे सर्व पालकांचा आपल्या मुलांनी इंजिनिअरच व्हावे हे ठरवुन टाकले.

पुढे हळू-हळू मॅन्युफॅक्चुरिंग विभागाची वाढीची ची कॅपॅसिटी पूर्ण झाली आणि या विभागात नवीन नोकऱ्यांची संख्या कमी झाली. पण त्याच वेळेस, इन्फॉरमेशन टेकनोलॉजि ह्या विभागात खूप प्रगती होऊ लागली. मुळात या विभागात मनुष्यबळ खूप लागते, म्हणून नवीन लोकांना खूप संधी मिळू लागल्या. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअर लोकांची प्रचंड मागणी तय्यार झाली. पूरक मनुष्यबळ नसल्यामुळे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिविल ह्या ब्रांच मधून पास होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कंपनी कॉम्प्युटर ट्रैनिंग देऊन नोकरी देऊ लागल्या. पुढे तर कोणत्याही ग्रॅजुएट (ज्याने कॉम्प्युटर कोर्स केलेला आहे) ला कंपनीमधे नोकरी भेटू लागली. थोड्याच वर्षात इन्फॉरमेशन टेकनोलॉजि चा देशाच्या इकॉनॉमी मधील वाटा हा  ०% पासून ५% पर्यंत गेला. परंतु मॅन्युफॅक्चुरिंग प्रमाणे मागील एक दोन वर्षात इन्फॉरमेशन टेकनोलॉजि विभागात प्रगती संथ झाली आहे. याचा परिणाम नवीन नोकऱ्यांवर झाला आहे. आता कंपन्या आधीप्रमाणे नवीन मुलांना ट्रैनिंग देण्यापेक्षा, १-२ वर्ष अनुभव असलेल्या लोकांना नोकरी देणे पसंत करते. यात कंपनी चा वेळ आणि पैसा दोन्ही पण वाचतात.

वरील सर्व गोष्टींमुळे इंजिनिअर लोकांची गरज दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याच्या उलट, इंजिनियरिंग पदवी चे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक पदवीधर इंजिनिअर लोकांना आज नोकरी मिळणे अवघड झाले आहे. कमी मागणी आणि जास्त पुरवठा Smartelix-employment-problems-freshersयामुळे इंटरव्हियू मधे उत्तीर्ण होण्यासाठी आज आधीपेक्षा जास्त गुणसंख्या, स्किल लेव्हल आणि प्रॅक्टिकल माहिती ची मागणी होत आहे. याउलट आज जे नवीन इंजिनिअर पास होताहेत, त्यांच्यात नोकरी करण्यासाठी स्किल लेव्हल व प्रॅक्टिकल माहिती हि फारच कमी आहे किंवा अस्तित्वातच नाही असे म्हटले तरी हरकत नाही. जर आपण भारतातले टॉप चे कॉलेज सोडले तर बरेचसे असे विद्यार्थी आहे, ज्यांना हे सुद्धा माहित नाही कि आपण इंजिनियरिंग च्या ४ वर्षात नक्की काय शिकलो. अश्या परिस्थिती मध्ये कंपनी ने त्यांना नोकरी तरी कशी द्यावी?

आज जर नोकरदार वर्गाचा अभ्यास केला तर दिसून येते की, अनेक इंजिनिअर अश्या क्षेत्रात काम करत आहेत जिथे इंजिनियरिंग चा अभ्यासक्रमाचा काहीही संबंध नाहीये. याचं कारण म्हणजे इंजिनियरिंग क्षेत्रात नोकरी भेटली नाही म्हणून, ते लोक ज्या क्षेत्रात नोकरी भेटेल तिथे काम करत आहेत. यात बऱ्याच नोकऱ्या ह्या १०-१५ हजार पगाराच्या आहेत. आता इंजिनियरिंग चे शिक्षण हे काही फार स्वस्त नाहीये. या अभ्यासक्रमासाठी पालकांना साधारणपणे ७-१० लाख रुपये खर्च करावा लागतो. एवढं करून हि जर १०-१५ हजाराची इंजिनियरिंग क्षेत्रात नोकरी मिळत नसेल तर पालक नाराज होतातच पण मुलांचं सुद्धा डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रमाण वाढत आहे.Smartelix-jobs-unemployment-freshers

या सर्व गोष्टींवरून तुम्हाला दिसून येईल कि, आज इंजिनिअरिंग हे करिअर क्षेत्र निवडल्यामुळे आपल्या युवा पिढीचं कितीतरी नुकसान होत आहे. याउलट कमी पैशात ग्रॅड्युएशन करून अनेक कामाच्या संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती दहावी / बारावी मध्ये मुलांना करिअर च्या विविध संधी आणि त्यासाठी लागणारे शिक्षण याच्याबद्दल माहिती करून देण्याची.

मुलांनी आणि पालकांनी आता इंजिनिअरिंग च्या भूतापासून दूर जाणे, हेच त्यांच्यासाठी हिताचे ठरणार आहे.

तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, खाली कॉमेंट मधे नक्की कळवा.

Leave a Reply